Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ जुलै, २०२०

वाफेचे मशीन यांची मागणी बाजारात वाढली..! त्याचाच फायदा घेत काही संधि साधु व्यापारी ग्राहकांची करताय आर्थिक लुट..!



नाशिक प्रतिनिधी:सध्या दोन वेळा वाफ घेतल्याने तसेच जास्त धोका असल्यास दर दोन तासांनी वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो.

असा संदेश मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे त्यामुळे वाफेचे मशीन यांची मागणी बाजारात वाढली आहे त्याचाच फायदा घेत काही संधि साधु व्यापारी ग्राहकांची आर्थिक लुट करत आहेत शंभर ते 120 रुपयाला मिळणारे वाफेचे मशीन घाऊक विक्रेते चक्क तीनशे-साडेतीनशे रुपयाला किरकोळ विक्रेत्यांना विकत असून ते विक्रेते ग्राहकांना चारशे साडेचारशे रुपये ला मशीन विकत आहेत

मशीनच्या अधिक किमतीबद्दल व्यापाऱ्यांना विचारले तर वाफेच्या मशीनची कमतरता असल्यामुळे भाव वाढलेले आहेत तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या अन्यथा नका घेऊ असे उर्मट उत्तर ग्राहकांना देत आहेत त्यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट होत असून असे संधीसाधू नफेखोर व्यापाऱ्यांवर संबंधित प्रशासनाने कडक कारवाई करावी.अशी मागणी नागरिकानडुन होत आहे

कोरोना व्हायरसबद्दल लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे . कोरोनामुळे वाढत असलेल्या मृतांचा लक्षात घेता जो तो व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

या आजारावर आत्तापर्यंत कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही . लोक आपापल्या पद्धतीने या आजाराला रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय घेताना दिसून येत आहेत.

प्रतिक्रिया

शंभर ते दीडशे रुपयाला वाफेचे मशीन आम्ही ग्राहकांना देत होतो तेच मशीन आता तीनशे-साडेतीनशे रुपयाला घाऊक विक्रेते आम्हाला देत आहेत त्यामुळे आम्ही ग्राहकांना कुठल्या किमतीत विकावे हा प्रश्न पडत आहे घाऊक विक्रेते माल शिल्लक नसल्याचे कारण देऊन चढ्या दराने मशीन विकत आहेत त्यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट होत असून हे कुठेतरी नियंत्रणात आणणे गरजेचे आहे

जावेद मणियार
किरकोळ विक्रेते

अनेक व्यापारी संधीचा फायदा घेत ग्राहकांची आर्थिक लूट करत आहेत अश्या संधीसाधू व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे

निलेश साळुंखे
शिवसेना विभाग प्रमुख




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध