Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० जुलै, २०२०

दहावी,बारावी निकाल आणि उत्साही विद्यार्थी..!



पाठीमागच्या 10-12 दिवसाखाली 12 वी चाअन् काल दहावीचा ऑनलाईन निकाल लागला. निकाल बघता तुम्ही पोरं एकंदरीतच हूशारैत अस् तुमच्या गुणांवरून तरी दिसून येतय्. दहावी, बारावी  हे आपल्या शिक्षणाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत.अन् ते तुम्ही यशस्वीपणे पार केलेत त्याबद्दल प्रथमतः तुमच अभिनंदन..!!

यामध्ये मार्क जास्त मिळाले म्हणून हुरळून जावू नका ही तर आता कुठ सुरूवात आहे.. अन् मार्कस् कमी पडलेत,म्हणून अपयशीही वाटू देवू नका..कारण हातातून निसटलेल्या मातीसाठी हळहळ करत बसण्यापेक्षा नवी मुठ भरण्यासाठी सज्ज व्होनं महत्त्वाचं असतय्... आपण काय आहोत अन् काय घडवू शकतो याची स्वओळख करून घ्या.. या परिक्षांचा निकाल हा तुमच भविष्य कदापिही ठरवू शकत नाही..आलेला निकाल हा फक्त परिक्षेचा निकाल आहे, तुमच्या आयुष्याचा नाही चांगल लक्षात असुद्या.. 

प्रत्येक जण आता सांगल की, पालकांचं कर्तव्य बनत  ते म्हणजे पोरांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडायचं स्वातंत्र्य द्यायचं.. हे जरी खरं असलं तरी  बर्‍याच जनानां (mostly ग्रामीण भागातील विद्यार्थ्याी) आपल आवडत क्षेत्र कोणत अन् ते कसं ओळखायच हेच लक्षात येत नाही... त्यासाठी त्यानां दहावी बारावी नंतर कुठल्या क्षेत्रात कुठल्या संधी येतात,त्यासाठी कोणत्या मार्गाने जायला हवं,नेमका कुठला अभ्यास करायला हवा, Strong अन्  कमकुवत बाजू कोणत्या आहेत अशी नेमकी माहीती पुरवून त्याचा Track निश्चित करण्यासाठी मदत करन् ही पालकांची खरी गरज आहे..(पालक या शब्दात - parents, friends,अन् विद्यार्थ्यांच भल पहानरे सगळेच आले). Actually या वयात विद्यार्थ्यांना कोणीतरी कुठलीतरी जुजबी माहिती दिलेली असते अन् त्यावरूनच तो दिशा ठरवतो, मुळात त्यापेक्षाही खूप विस्तृत क्षेत्र आहेत अन् भरमसाठ संधीही उपलब्ध आहेत याची जाणीव त्या विद्यार्थ्याला होने गरजेचे आहे. जवळ जवळ प्रत्येकाकड Android मोबाईल आहेच त्याचा उपयोग फक्त Status, Story, whts up यासाठी न करता, त्याचा उपयोग Google,You tube ची मदत घेवून नवनवीन क्षेत्रांची माहीती घेण्यासाठी करून घ्या.

आणि एकदा का Track निश्चित झाला की,आपल्या पाल्यांना त्यांच्या पद्धतीने पुढे जाण्याची मुभा द्या पण सोबतच जबाबदारीचं ओझं त्याच्या उरावर लादण्यापेक्षा जबाबदारी पेलण्यासाठी आवश्यक ताकदीचं बाळकडू त्यांना देत रहा..वेळोवेळी कर्तव्याची जाणीव करत रहा..अन् एकदा का त्यांना कर्तव्य, जबाबदारी आणि ओझं यातला फरक कळला की मग त्यांच्या फारशा तक्रारी नाहीत राहणार...मग तुमचा पोरगा किंवा पोरगी आयुष्याच्या परिक्षेत फेल तर होणार नाहीच पण स्वतःवर आलेली पुण्याप्रत जबाबदारी कसल्याही दबावाखाली न राहाता पुर्ण करेल..

शिक्षणाने तुम्ही स्वतःचा, समाजाचा, देशाचा विकास हातभार नक्की लावू शकतात, त्यासाठी ठाम रहा..बाकी स्व निर्मिती आणि राष्ट्र निर्मितीसाठी आयुष्यभराच्या शुभेच्छा..! 

लेखक:- श्री.मल्हारी हनुमंत भिलारे  (लिपिक, N.D.A.खडकवासला,पुणे)

संकलन:- श्री.राहूल शिंदे (तरुणगर्जना,विभागीय संपादक, उस्मानाबाद, 9975114800)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध