Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ जुलै, २०२०

भाजपाचे उस्मानाबाद जिल्हा प्रभारी म्हणून बीड चे रमेश पोकळे यांची निवड..!



भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी यांची महत्वपूर्ण ऑनलाईन बैठक सोमवारी सकाळी 10 ते दु 2  वाजेपर्यंत संपन्न झाली.
             
या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आवर्जून उपस्थित होते.

या बैठकीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्हि सतिश जी यांच्यासह केन्द्रीय मंञी ना. पियुलजी गोयल  ना प्रकाशजी जावडेकर  भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे, प्रदेश सरचिटणीस आ.सुरजितसिंहजी ठाकूर, प्रदेश उपाध्यक्षा खा.डाॅ प्रितमताई मुंडे यांच्यासह भाजपाचे प्रदेश पदाधिकारी ऑनलाईन बैठकीत उपस्थित होते.
      
यावेळी भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री विजयरावजी पुराणीक यांनी भाजपाचे संघटनात्मक कार्य गतिमान होण्यासाठी  भाजपाच्या राज्यातील  जबाबदार व अनुभवी पदाधिकारी यांची महाराष्ट्रातील सर्व  जिल्ह्यासाठी भाजपाचे  प्रभारी  म्हणून यादी जाहीर केली आहे.

या यादी मध्ये बीड  भाजपाचे माजी  जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यसमिती सदस्य रमेशभाऊ पोकळे यांची धाराशिव ( उस्मानाबाद )जिल्हा प्रभारी म्हणून निवड केल्याचे प्रदेश संघटन मंत्री विजयरावजी पुराणीक यांनी प्रदेश बैठकीत जाहिर केले आहे.
               
तेव्हा या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यासाठी बीड जिल्ह्यात भाजयुमो जिल्हाध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून सलग 12 वर्ष संघटनात्मक कार्याचा अनुभव असलेला लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या तालमीत तयार झालेला कुशल संघटक   व मराठवाड्यातील शैक्षणिक चळवळीत सतत सक्रीय असलेला रमेश पोकळे यांच्या सारखा अष्टपैलू चेहरा जिल्हा प्रभारी म्हणून लाभल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील भाजपाचे संघटनात्मक कार्य आणखी गतिमान करण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे.
           
रमेश पोकळे यांची धाराशिव ( उस्मानाबाद) जिल्हा प्रभारी म्हणून निवड झाल्याबद्दल भाजपा नेत्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताईसाहेब मुंडे यांच्यासह भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ सुरजितसिंहजी ठाकूर,प्रदेश उपाध्यक्षा खा डाॅ प्रितमताई मुंडे , मराठवाडा संघटन मंत्री भाऊरावरावजी देशमुख, लातुर बीड धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आ.सुरेशजी धस ,भाजपाचे विधी सेल चे प्रदेश संयोजक अॅड मिलिंद पाटील,भाजपा प्रज्ञावंत प्रकोष्ट संयोजक दत्ता कुलकर्णी भाजपाचे धाराशिव  जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध