Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ जुलै, २०२०
फार्मसी क्षेत्रातील करिअर..!
फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रात ही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त आयटी कंपनी म्हणून ओळख असणार्या कंपन्या सुध्दा औषधीनिर्मितीकडे वळत आहेत. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण होता आहेत. फार्मसी कोर्स केल्यावर मेडिकल शॉप उघडायचं असं नव्हे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. फार्मसीमध्ये फार्मडी हा नवीन कोर्सही येऊ घातला आहे.
जगाच्या नकाशात औषधनिर्मित क्षेत्रात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वात स्वस्त औषध पुरवठादार म्हणून भारताची ओळख आहे. दुर्धर समजल्या जाणार्या विविध औषधांवर देखील भारतात यशस्वी संशोधन होत आहे. आरोग्यविषयक सॉफ्टेवेअर विकसित होत आहे.
त्यामुळे फार्मसी म्हणजे फक्त औषधाचे दुकानही ओळख आता नाहीशी होत आहे. परदेशांत डॉक्टर पेशंटला औषधे लिहून देत नाहित.
डॉक्टर आजाराचे निदान करतात आणि फार्मसिस्ट त्यावर औषध देतात. भारतात तशी परिस्थिती नाही. जगात अमेरिका औषधनिर्मितीमध्ये आघाडीवर आहे. इतर देशांमध्ये देखील फार्मसिस्ट आवश्यक असतात.जगात ८०टक्के देशांत भारत औषध पुरवठा करित आहे.
भारतात अनेक फार्मसीमध्ये कंपन्या संशोधन करीत आहेत. क्लिनिकल रिसर्च, आयटी कंपनी, क्लिनिकल ट्रायल ही नविन क्षेत्रं खुली होत आहेत. फार्मसीसाठी डिप्लोमा इन फार्मसी आणि बी फार्म करणार्यांच्यी संख्या जास्त होती. डी फार्म करुन औषधांचे दुकान आणि बी फार्म नंतर दुकान किंवा नोकरीचाच विचार केला जात होता; परंतु गेल्या काही वर्षात ही परस्थिती बदलली आहे. अशी समजूत होती; परंतु भारताच्या बहुतेक राज्यांत औषध कंपन्या आहेत. केमिकल कंपन्यांमध्ये सुध्दा फार्मसीचं शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात.
आधी फार्मसीमध्ये मास्टर्स डिग्री घेण्यार्यांची संख्या कमी होती; परंतु आज काल मास्टर्स करणार्यांची संख्या वाढत आहे.
सायन्स शाखेतील एक क्षेत्र म्हणून फार्मसीकडे पाहिलं जातं.नवीन औषधांची निर्मिती, जी औषधे आहेत त्यांच्यात काळानुसारबदल/विकासकरणे आणि औषधांचं वितरण आदी कामे याक्षेत्रातील पदवीधर म्हणजे फार्मसी ग्रॅज्युएट करतात. आपल्या आजारांवर डॉक्टर आपल्याला औषधं देतात.
याच औषधांचे उत्पादन करणे,नवनवीन औषधे शोधणे, औषधांची गुणवत्ता तपासणे आणि सांभाळणे,औषधे बाजारात आणण्यापूर्वी प्रयोगशाळेत त्यांच्या तपासण्या करणे, या औषधांचा मानवी शरीरावर दुष्परिणाम (साइडइफेक्ट्स) होऊ नये ही सर्व कामे फार्मासिस्ट करत असतो.
संधी - संशोधन, सरकारी नोकरी, स्वतंत्र व्यवसाय, हॉस्पिटल मॅनेजमेंट.
शैक्षणिक पात्रता
फार्मसीचा कोर्स करण्यासाठी पीसीएम/बी विषय घेऊन बारावी सायन्स पास असणं आवश्यक आहे. या क्षेत्राचा पाया कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षातच घातला जातो.
अकरावी-बारावी (सायन्स) ला असणाऱ्या बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयांच्या अभ्यासाचा फायदा पुढे जाऊन फार्मसीचा अभ्यास करताना होतो.
फार्मसीमध्ये डिप्लोमा इन फार्मसी आणि बॅचलर इन फार्मसी हे दोन प्रकारचे (डिप्लोमा आणि डिग्री) कोर्स उपलब्ध आहेत. सरकारी तसेच, खाजगी संस्थांमध्ये हा कोर्स उपलब्ध असून तिथे प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
अभ्यासक्रम
डी. फार्म-बारावीनंतर डिप्लोमा फार्मसी करता येते. दोन वर्षाचा हा कोर्स असतो. डिप्लोमा फार्मसी हे त्या क्षेत्रातील प्राथमिक शिक्षण असल्याने ज्यांना बारावीत कमी गुण आले आहेत,त्यांनी डिप्लोमाचा विचार करायला काही हरकत नाही. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर पदवीच्या दुसर्या वर्षाला प्रवेश मिळतो. मेडिकल रिप्रेझेंटिव्ह आणि फार्मसीचे दुकान या संधी असतात.
बी. फार्म -बारावीनंतर चार वर्षाचा हा कोर्स आहे. या कोर्सनंतर डिप्लोमा फार्मसीच्या विध्यार्थ्याना शिकवता येते. औषधनिर्मिती कंपनीमध्ये नोकरीच्या संधी असतात. कंपनीमध्ये विविध शाखांमध्ये काम करता येते.
एम. फार्म -फार्मसी क्षेत्रातील मास्टर्स डिग्री असल्याने संशोधन विभागामध्ये काम करता येते. डिप्लोमा आणि डिग्रीच्या विध्यार्थ्यांना शिकवता येते.
फार्म डी – वरील कोर्सच्या व्यतिरिक्त हा नवीन कोर्स आहे. फार्मडी नावाचा हा कोर्स असून, डॉकटर ऑफ फार्मसी असा याचा अर्थ आहे. सहा वर्षांचा हा कोर्स असून, प्रथम अमेरिकेत हा कोर्स सुरु झाला. डॉक्टरसोबत या विध्यार्थ्यांना काम करावे लागत असल्याने हे विध्यार्थी डॉक्टरला औषध लिहून देण्यात मदद करु शकतात. फार्मसी आणि मेडिकल असे सर्व शिक्षणया विध्यार्थ्यांना घेता येते. त्यामुळे हे विध्यार्थी फार्मासिस्ट आणि डॉक्टर यांच्यातील दुवा असतो.
नोकरीच्या संधी
बी.फार्म आणि डी.फार्म केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी क्षेत्रात, केमिकल इंडस्ट्रीज, अन्न आणि औषध उत्पादन क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात. याशिवाय, स्वत:चं मेडिकल/फार्मसी स्टोअर सुरू करण्याचा पर्यायही आहे. फार्मसी स्टोअर सुरू करण्यासाठी स्टेट फार्मसी कौन्सिलकडून लायसन्स मिळवावं लागतं. बरेचसे फार्मसी पदवीधर झालेले विद्यार्थी बायोटेक लॅबोरेटरीज मध्ये काम करणं पसंत करतात, तर काही जण फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सच्या सेल्स आणि मार्केटिगचं काम करायला प्राधान्य देतात. काही उपलब्ध पद:
फार्मासिस्ट
बी.फार्म केलेल्या विद्यार्थ्यांना हेल्थ सिस्टम फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट, इंडस्ट्रिअल फार्मासिस्ट, रिटेल फार्मासिस्ट आणि रिसर्च फार्मासिस्ट म्हणून काम करता येते.
क्वॉलिटी अश्युरन्स
क्लिनिकल केअर योजना विकसित करणे, प्रतिकूल औषधोपचारांच्या घटनांचा तपास करणे तसेच असाध्य आजारांविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम क्वॉलिटी अश्युरन्स म्हणून काम करणारे फार्मसी पदवीधर विद्यार्थी करतात.
क्वॉलिटी कंट्रोल
औषधे नियामक मंडळाच्या नियमांनुसार गुणवत्ता पूर्ण औषधांची निर्मिती होत आहे, की नाही हे पाहण्याचं काम क्वॉलिटी कंट्रोलर म्हणून काम करणारे फार्मसी पदवीधर करतात.
क्लिनिकल रिसर्च
बायोइक्विव्हॅलन्स, बायोअॅव्हॅलिबिलिटी, सेंट्रल लॅबोरेटरीज या सारख्या ठिकाणी क्लिनिकल ट्रायल्स, क्लिनिकल रिसर्च, इन्व्हेस्टिगेशन, टेक्निकल रायटर्स आदी पदांवर फार्मसी ग्रॅज्युएट्स काम करतात.
प्रा.कुंदन हेमंत देवरे गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी, नगाव, धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे सप्टेबर २०२४ शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर ३-४ नराधमांनी केलेल...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माह...
-
मोफत वीज, वाढीव अनुदान आणि वेगवान गृहनिर्माण... प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शा...
-
अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्य...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
संपादकीय भारताच्या संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. संविधान कायद्यापुढे समानता ही आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या...
-
रस्ता मंजूर नाही;पाटी का लावली? ग्रामस्थांचा सवाल नंदूरबार प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी ५ किलोमीट...
-
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.28 महाराष्ट्र बोर्डाने मार्च2020 दहावीच्या निकालाची तारीख आता जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा