Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

गंगामाई बी फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार..!


नगावं येथील बी फार्मसी महाविद्यालयातर्फे नुकतेच आंतरराष्टरीय वेबिणार आयोजन करण्यात आले .वेबिनारचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिलकुमार टाटीया यांनी केले.सहभागी विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. नफीस अहमद स्कूल ऑफ फार्मसी, मोणाश युनिव्हर्सिटी, मलेशिया यांचे कंपुटेशनल एप्रोचेस फॉर ड्रग डिस्कवरी या विषयावर मोलाचे मार्गदर्शन लाभले. कॉम्प्युटर च्या साहाय्याने एखाद्या नवीन ड्रग चा शोध कसा लावावा या संबंधी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. 

या वेबिनारमध्ये भारतातून महारष्ट्र सह केरळ, उत्तरप्रदेश, कर्नाटका,मध्यप्रदेश, गुजरात येथील 1हजार 500 विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम या संकल्पनेतून संपन्न होत असलेल्या या विविध वेबिणारचे समन्वयक म्हणून डॉ. सुफियान अहमद व मॉडरेटर डॉ रागीब उस्मान यांनी काम पाहिले.या वेबीनार चे संस्थेचे सचिव श्री बाळासाहेब मनोहर भदाने, उपाध्यक्ष माईसाहेब ज्ञानज्योती भदाने ,अध्यक्ष राम भदाने यांनी कौतुक केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध