Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ जुलै, २०२०

राजस्थान विधानसभा अधिवेशन त्वरित हुकूमशाही केंद्र सरकारचा निषेध..!



चोपडा प्रतिनिधी-केंद्रातील भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करून विविध राज्यातील लोकनियुक्त सरकारे पाडण्याचा सपाटा लावला आहे. अशाच गैरमार्गाने राजस्थान राज्यातील लोकनियुक्त काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि राजस्थान विधानसभेचे अधिवेशन तातडीने बोलवावे अशा आशयाचे निवेदन चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी यांनी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तहसीलदार श्री अनिल गावित साहेब यांना देण्यात आले. 

यावेळी बोलताना के डी चौधरी, राजाराम बाबुराव पाटील यांनी भाजप सरकारमूळे लोकशाहीचा खून केला जात असून, संविधान धोक्यात आले आहे. भाजप सरकारचा गैरवापर थांबून राजस्थान राज्यातील फ्लोअर टेस्ट लवकर करावी अशी मागणी करण्यात आली. 

निवेदनावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सुरेश सिताराम पाटील, हाजी मेहमूद अली सैय्यद, चेतन पंढरीनाथ बाविस्कर, रमेश एकनाथ शिंदे, ॲड. संदेश जैन, नंदकुमार सांगोरे,पुष्कराज नेरपगार , आशिक हुसेन रमजानी, मधुकर विठ्ठल बाविस्कर, बागुल जिवन जिजाबराव , ईलियास पटेल, सूर्यकांत के. चौधरी, ज्ञानेश्वर आनंदा चौधरी, फातीमाबी माजी नगरसेविका, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत . लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध