Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ जुलै, २०२०

अमळनेर पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून रूजू




प्रशासनात बदल घडविताना..

15 नोव्हेंबर 2017 रोजी मी अमळनेर पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून रूजू झालो.या पावणेतीन वर्षातील काही कालावधी वगळता बराचसा काळ मी गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. 

मी हजर झालो तेव्हा अमळनेर पंचायत समिती मधील प्रशासनाची अवस्था अत्यंत दयनीय होती.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे बांधकाम मोठ्या प्रमाणात प्रलंबित होते. वैयक्तिक लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान (बक्षिस)मिळत नसल्याने लाभार्थ्यांना वारंवार पंचायत समिती मध्ये फे-या मारायला लागत होत्या व ग्रामपंचायती एजन्सी म्हणून काम करत असलेली कामांची देयके निघत असल्याने लोकांचा संताप होत होता. 

घरकुलं लाभार्थ्यांचे हप्ते वेळेवर पडत नसल्याने लाभार्थी वारंवार पंचायत समिती मध्ये येऊन संताप व्यक्त करत होते. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घरकुलं लाभार्थ्यांचे मस्टर वेळेवर निघत नसल्याने लाभार्थी खूपच परेशान झाले होते. अमळनेर पंचायत समिती ही प्रत्येक कामाच्या बाबतीत जिल्हा परिषदेमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती.

शौचालयाचे वीस हजारांच्या आसपास उद्दीष्ट शिल्लक होते. प्रधानमंञी आवास योजनेचे 2018मध्ये फक्त 22% घरकुलं पूर्ण होती.अमळनेर तालुक्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या होती व टँकर वेळेवर येत नसल्याने सरपंच व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी वारंवार पंचायत समिती पदाधिका-यांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी करत होते परंतु कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने फक्त  त्यादिवसापुरती समस्या सुटून परत ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होती. 

पंचायत समिती चे कर्मचारी व ग्रामसेवक जागेवर सापडत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत्या. माहिती अधिकार अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात अर्ज पंचायत समिती मध्ये येत होते. दररोजच्या टपालात मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने व त्या तक्रारींवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या अधिका-यांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत होत्या. 

पाणी टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणावर विहीरी अधिग्रहण केल्या होत्या व त्यांची देयके मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याने काही शेतकरी आडमुठेपणाची भूमिका घेऊन पाणी बंद करत होते आणि पाणी मिळत नसल्याने गावातील लोक पंचायत समिती येऊन दांगडो करत होते त्यामुळे पंचायत समिती मध्ये रोज काही ना काही  दांगडो सुरूच होता व पंचायत समिती मधील कर्मचारी हे दहशतीखाली काम करत होते. परिस्थिती इतकी वाईट होती की पाणी टंचाईच्या टेबलवर कुणीही कर्मचारी काम करायला तयार नव्हता.काही ग्रामसेवक व शिक्षक मंडळी ही इतकी निर्ढावली होती की ते आपले स्वताचे काम करण्यापेक्षा पंचायत समितीच्या प्रशासनात हस्तक्षेप करत होती.
          
अमळनेर पंचायत समिती मध्ये मी हजर झाल्या नंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थ्यांची देयके काढायला प्राधान्य दिल्याने काही महिन्यात चं वैयक्तिक लाभार्थ्यांची देयके मोठ्या प्रमाणावर निघाली व त्यामुळे पंचायत समिती मध्ये येणारी गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. पाणी टंचाईचे काम स्वतःहून माझ्याकडे घेतले व टँकरचे व्यवस्थितपणे नियोजन केल्यामुळे पुढच्या दोन वर्षांत पाणी मिळत नाही म्हणून कुणीही  पंचायत समिती मध्ये आले नाही.घरकुलं लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर घरकुलं लाभार्थ्यांना त्याच दिवशी हप्ता त्यांच्या खात्यात पडेल यासाठी कर्मचा-यांना सूचना दिल्या व स्वतः वैयक्तिक रित्या पाठपुरावा केला. 

पुढील काळात लोकांचे हप्ते वेळेवर पडत असल्याने व कुठल्याही प्रकारची अडचण येत नसल्याने अमळनेर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात घरकुलं अतिशय वेगाने बांधली गेली. प्रत्येक घरकुलं लाभार्थ्याचे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मस्टर टाकले त्यादिवशी काढण्याच्या सूचना दिल्याने लाभार्थ्यांना पंचायत समिती मध्ये वारंवार येण्याची गरज भासली नाही.

अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी व आपले सरकार सेवा केंद्र परिचालक यांचे मानधनाचा ब-याच काळापासून प्रलंबित असणारा प्रश्न वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून सोडवला.ग्रामपंचायत स्तरावरुन अपंग लाभार्थ्यांना लाभ मिळेल यासाठी व्यक्तीशः पाठपुरावा केला. नागरिकांच्या तक्रारी जागेवरच सोडवण्यासाठी प्रयत्न  केला व प्रत्येक अडचण स्वतःची च आहे असे समजून शासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे अमळनेर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात सोडवण्यासाठी मदत झाली. माहिती अधिकाराची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे निकालात काढली.जी कामं नियमात बसत होती ती तात्काळ करून टाकली व जी नियमात बसत नव्हती त्यासाठी शासन स्तरावर निर्णय होण्यासाठी व्यक्तीशः पाठपुरावा केला. 

विहीर अधिग्रहणासाठी अनुदान उपलब्ध होण्यासाठी जिल्हा स्तरावर व्यक्तीशः पाठपुरावा केला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळाले.परिणामी मार्च 2020 पर्यंत विहीर अधिग्रहणाची सर्व शेतक-यांची देयके अदा केलेली आहेत.पंचायत समितीमध्ये प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये शिस्त आणण्यासाठी प्रयत्न केला. कामचुकारपणा करणारे व चुकीची कामे करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबतीत अतिशय कठोर भूमिका घेतली. दोन वर्षांत ग्रामसेवक व कर्मचारी मिळून अठरा जणांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

चौदावा वित्त आयोगाच्या अंतर्गत 50 ग्रामपंचायतींची मी स्वतः दप्तर तपासणी केली असून आर्थिक अपहार करणारे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कुठल्याही प्रकारची भीडभाड न बाळगता गुन्हे दाखल केले आहेत.नागरिकांच्या अडचणींच्या व तक्रारींच्या बाबतीत फक्त कागदी घोडे न नाचवता ती समस्या मुळापासून सोडण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचारी व अधिकारी यांना विनाकारण नोटीसा काढून मनस्ताप देण्यापेक्षा त्यांना समजावून सांगून किंवा फोन करून काम करण्यासाठी प्रवृत्त केले व एखाद्यावर कारवाई करण्यापेक्षा त्याच्या हातून काम होईल याला प्राधान्य दिले. 

ज्यांना सांगून सुधारणा झाली नाही त्यांच्यावर कुठल्याही विरोधाला न जुमानता कठोर कारवाई केली आहे. प्रामाणिक पणे काम करणारे अधिकारी व कर्मचारी  यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतल्यामुळे कर्मचा-यांमध्ये व अधिका-यांमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला आहे. फेसबुक,what's up या सोशल  मेडिया व प्रसारमाध्यमांचा वापर शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी यशस्वीरित्या झाल्याने सर्वसामान्य जनता व पञकार हे प्रशासनाशी जोडले गेले आहेत.आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व जिल्हा परिषदेचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सर्व संघर्षाच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यानेच हे सर्व शक्य झाले आहे.  

अमळनेर तालुक्यात पंचायत समिती मध्ये काम करत आसताना तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी पाठीशी उभे राहिल्याने व्यवस्थेतील अपप्रवृत्तींवर मात करणे शक्य झाले असून एक स्वच्छ,पारदर्शक,गतिमान व लोकाभिमुख व्यवस्था उभा करण्यात आम्ही सर्वजण यशस्वी झालो आहोत. 

शासन व प्रशासन ही व्यवस्था ही लोकांसाठी उभा केली असून सर्वसामान्य लोकांना ती व्यवस्था आपली आहे व ती व्यवस्था आपल्या साठी आहे असा विश्वास वाटला पाहिजे. शासन व प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील दरी जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा लोकशाही ख-या अर्थाने यशस्वी झाली असं म्हणता येईल.If you want to change the system,you must be part of the system otherwise you will do nothing except criticising.When you face the challenges in life face them face to face.व्यवस्था बदलू शकते पण ती बदलण्याची धमक तुमच्यामध्ये असली पाहिजेतं .आदरणीय समाजसेवक आण्णा हजारेंच्या भाषेतचं सांगायचं झालं तर शेतात जोंधळ्यांचं पीक जर जोमदार यायचं असेल तर काही दाण्यांनी स्वतःला जमीनीमध्ये गाडून घ्यावं लागेल.

व शेवटी जाता जाता एवढचं सांगेन की 
दुनिया में शिकायत करने वालों की कोई अहमियत नहीं होती रूत्बा तो उन लोगों का होता है जिनके पास दुख की दवा है
श्री.संदीप दिलीप वायाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती अंमळनेर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध