Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ जुलै, २०२०

एनजीओ फेडरेशनच्या जिल्हा समन्वयकपदी डाॅ जनार्दन वानखडे यांची निवड..!




शेगाव (प्रतिनिधी उमेश राजगुरे) येथील जय बजरंग युवक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा पक्षीप्रेमी,पर्यावरणवादी डाॅ जनार्दन वानखडे यांची महाराष्ट्र स्टेट एनजीओ फेडरेशनच्या बुलडाणा  जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. 

तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र स्टेट एनजीओ फेडरेशनचे सचिव बाळासाहेब देशमुख
यांनी दिले. डाॅ वानखडे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून दहा हजार पेक्षा जास्त महिला-पुरुषांचे संघटन उभे केले असून प्रकल्प प्रशिक्षण संस्था म्हणून सध्या कार्यरत आहे.

तालुक्यात विविध सामाजिक कामे यशस्वीपणे पार पाडत डाॅ जनार्दन वानखडे  यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र स्टेट एनजीओ फेडरेशनने त्यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती केली
आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यानी 
त्यांचे अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध