Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे घवघवीत यश, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव....!



परंडा (राहूल शिंदे) दि.31तालुक्यातील चिंचपूर बु हे अगदी मराठवाड्याच्या सरहद्दीवरील खेडेगाव,येथील ज्ञानदीप कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे त्याबद्दल यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

सेमी माध्यमातून कु. प्रतीक्षा हजारे 95.20%गुण मिळवून क्लासमधून प्रथम, कु.पूनम झांबरे 93.80%गुण (गणित 100गुण) मिळवून द्वितीय,कु.निधी देवकर89.20% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. 

तसेच मराठी माध्यमात कु. अश्विनी सुरवसे 91.80%गुण घेऊन प्रथम व कु.नम्रता वीर हिने 85.80%गुण घेऊन द्वितीय. कु.राधा ढगे 81.80%गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला या यशा बद्दल गुणवंतांचा सन्मान सनराईज स्कूल चे प्राचार्य श्री.संभाजी देवकर सर ,श्री.पांडुरंग शिंदे,श्री.विजय सुरवसे,श्री.गणेश वीर,श्री.बाबासाहेब झांबरे यांच्या हस्ते करण्यात आला.व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.मार्गदर्शक श्री.प्रकाश शिंदे सर,यांनी सूत्रसंचालन केले तर श्री.राहुल शिंदे सर यांनी आभार मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध