Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ जुलै, २०२०

गलंगी नाक्यावर वाहनांची तपासणी



थाळनेर  : सध्या देशासह राज्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूने थैमान घातल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढत आहे. या पाशचर्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून जिल्हा सीमेवर वाहनांची दिवसभर तपासणी करण्यात आली. येणाऱ्या-जाणाºया वाहनांना थांबवून पोलीस कर्मचाऱ्यांकडून चौकशी केली जात होती.
अंकलेश्वर- बºहाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश अशा तीन राज्यातून जातो. या महामार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता या राष्ट्रीय महामार्गावरील धुळे व जळगाव या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गलंगी येथील वन विभागाच्या चेक पोस्टजवळ थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे व उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व होमगार्ड, जळगाव महामार्ग पथक व वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी, चोपडा येथील होमगार्ड यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी अशा सात ते आठ कर्मचाºयांच्या पथकाने दिवस-रात्र वाहनांची कसून तपासणी सुरु केली आहे. वाहनधारकांची चौकशी करून रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध