Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ जुलै, २०२०

उस्मानाबाद येथील कोविड १९ तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राचे लोकार्पण..!



उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.23 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.

जिल्ह्यातील दानशूर सर्व बँका, साखर कारखाने, सहकारी संस्था,पतसंस्था, नगरपालिका, उद्योजक व प्रशासन, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच समाजातील व्यक्तींनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिलेल्या सहकार्यातून उस्मानाबाद कोवीड-१९ तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. 

यामध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य संजय मामा निंबाळकर यांचे हि मोलाचे सहकार्य आहे. 

या उद्घाटन प्रसंगी आरोग्य मंञी राजेशजी टोपे साहेब , जिल्हाचे पालकमंञी शंकरराव गडाख,खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आ.कैलास पाटील, आ.ज्ञानराज चौगुले,संजय मामा निंबाळकर, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.येवले, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जि.प.अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, उस्मानाबाद चे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, ब्रिजलाल मोदाणी साहेब, नॅचरल कारखान्याचे चेअरमनठोंबरे, भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी वर्ग, पञकार, समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध