Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ जुलै, २०२०

सोनारी येथील माकडांना फळे व खाद्यअन्न वाटप..!



परंडा (राहूल शिंदे) दि.25 संपूर्ण जगावर कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे.महाराष्ट्रात तर परिस्थिती खूप बिकट आहे.सर्व धार्मिक मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत. तालुक्यातील सोनारी येथील सुप्रसिद्ध कालभैरवनाथ मंदीर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने,बाजारपेठ,
भाविकांची ये-जा नसल्याने माकडांच्या खाण्या पिण्याचा प्रश्न निर्माण होतो.त्या पार्श्वभूमीवर आज विश्व मराठा संघ धाराशिव यांच्यावतीने माकडांना केळी खाऊ घालून काही खाद्य श्री.सचीन सोनारीकर यांच्या कडे सुपुर्द केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ कोकाटे,महिला जिल्हाध्यक्षा मनिषाताई चौधरी,रविंद्र तांबे पोलीस पाटील जेकटेवाडी,नितीन सुर्यवंशी कार्याध्यक्ष परंडा,मुकेश खैरे कार्याध्यक्ष भूम,रावसाहेब काळे तालुकाध्यक्ष परंडा,उमेश जाधव युवक कार्याध्यक्ष परंडा,अजित तांबे युवक तालुकाध्यक्ष भूम, नागेश नागटिळक युवक उपाध्यक्ष भूम, ज्ञनेश्वर मिस्कीन युवक तालुका उपाध्यक्ष परंडा,गोविंद बोंदरे आदी विश्व मराठा संघ धाराशिव. 

त्यानंतर तालुक्यातील सिनाकोळेगाव,
डोमगाव येथे बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध