Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ जुलै, २०२०

भष्टाचार विरोधी जन जागृती संघ तालुका सह-सचिव पदी सुभाष पाटील सत्रासेन..!



भष्टाचार विरोधी जन जागृती संघ तालुका सह-सचिव पदी सुभाष पाटील
चोपडा तालुका भ्रष्टाचार विरोधी जन जागृती संघाची सभा होवून तालुका सहसचिव पदी सुभाष पाटील(सञासेन) यांची निवड करण्यात आली.

सदर निवडीचे नियुक्ती पत्र व ओळख पत्र राष्ट्रीय अध्यक्ष रमेश विसपुते यांच्या हस्ते देण्यात आले.या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष यानी सांगितले की,सदरच्या पदाचा उपयोग भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी आहे.पद हे शोभेची वस्तु नसून त्या माध्यमातून काम केले गेले पाहिजे.पद हे निर्वड प्रसिद्धीचे साधन नसुन त्याला कामातून प्रसिध्दी मिळणे आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येक कार्यकत्यांने

पदाधिकाऱ्याने प्रसिद्धीच्या हव्यासं न करता तन -मन-धन लावून भ्रष्टाचाराला विरोध केल्यास त्याला आपोआप जनसामान्यातून प्रसिध्दी मिळाल्या शिवाय राहत नाही.तरी सगळ्यांनी जोमाने कामाला लागुन,समाजातील तळागळाच्या लोकांपर्यंत संघटनेचे नाव व काम पोहचविण्याची गरज आहे.

सदर निवडीचे डॉ .अशितोष भगाळे,डॉ.इंगळे,डॉ.प्रमोद सोनार , अॅड , जाहगिरदार,अॅड.बाविस्कर,बस्तिलाल राजपूत,डॉ.नवल मराठे,काझी,ढेकू दादी , महेंद्र भावसार,देविदास पाटील,राजू पाटील शेख हमीद,ए.आर.काझी,हरून मिस्तरी बालू कोळी,समाधान बाविस्क रमेश बाविस्कर,संदिप सोनवणे , प्रदिप न्हावी , इ.अभिनंदन केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध