Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ जुलै, २०२०

शिरपूर शहरातील जनतेला पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन..!



शिरपूर शहर तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने आगामी काळात मुस्लीम बांधवांचा बकरी ईद तसेच हिंदू बांधवांचा श्रावण मासमध्ये खान्देश कुलस्वामिनी कानुमाता,दशामाता,श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला(दहिहंडी) अशाप्रकारे सण उत्सवाचे आयोजन अगदी साध्या व घरगुती पध्दतीने करावे.

जेणे करून लोकांची गर्दी होवून कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही व रुग्ण संख्येत वाढ होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घ्यावी.

तसेच सण उत्सव साजरा करतांना कोणीही मिरवणुकीचे आयोजन करणार नाही त्याचप्रमाणे पारंपरिक वाद्य,डि जे इत्यादी वाजविण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असल्याने जे कोणी व्यक्ती / आयोजक सण उत्सव काळात मिरवणुका काढुन गर्दी करतांना तसेच पारंपरिक वाद्य ,डि.जे,वाजवितांना मिळुन आल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध