Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ जुलै, २०२०

खिज़र उर्दू माध्यमिक विद्यालयाचा निकाल 97.05 टक्के..!



रावेर प्रतिनिधी अजीज शेख 

विद्यालयातुन शारमीन युनुस प्रथम
तालुक्यातील चिनावल येथिल खिज़र उर्दू माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 97.05 टक्के लागला आहे.

यावर्षी विद्यालयातुन एकुण ६८ विद्यार्थांनी परीक्षा दिली होती त्यातुन 66 विद्यार्थी पास झाले असुन इतर 2 विद्यार्थांना पूर्नपरीक्षेसाठी पात्रता मिळाली आहे.

विद्यालयातुन सर्व प्रथम शारमीन बी शेख युनुस आली असुन तीला एकूण 80.40 टक्के गुण मिळाले, तन्ज़ीला बी शेख इरफान ही 80 टक्के गुण घेऊन व्दितीय आली व तृतिय महेक अंजुम शेख जावेद हीला 79.20 टक्के गुण मिळालेत.

यशस्वी विद्यार्थांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी सर्व विद्यार्थांचे कौतुक व अभिनदंन खिज़र शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष हयात खान, उपाध्यक्ष असलम खान, चेअरमन हसन मिस्तरी,उपचेअरमन शेख निसार, सचिव शरीफ खान, उपसचिव शेख मुस्तकीम, सदस्य शेख कलीम मेम्बर, शेख गफूर, शेख अबरार, शेख जावेद शेख हयात, मुख्याध्यापक शेख निसार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध