Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० जुलै, २०२०

एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च 2020 ऑनलाईन निकाल जाहीर..!



केसकर महेश,केसकर हरिदास ,देवरे प्रीति , भोगील करण,अनभुले दीक्षा,सुरवसे विजय, मुसळे अंजली , 

उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.30 महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल काल जाहीर झाला आहे. यंदा हा निकाल 95.30 %लागला  असून, यावर्षीदेखील बोर्डाच्या निकालामध्ये मुलींचं वर्चस्व पहायला मिळत आहे. तर 9 विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे.

20 विषयांचा निकाल 100% लागला आहे. मार्च 2019 च्या तुलनेत यंदा 18.20 % निकाल अधिक लागला आहे.

गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – 30 जुलै 2020 ते 8 ऑगस्ट 2020
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – 30 जुलै 2020 ते 18 ऑगस्ट 2020
विभागनिहाय बोर्डाचा संपूर्ण निकाल:
कोकण – 98.77 टक्के
पुणे –97.34 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
मुंबई – 96.72 टक्के
अमरावती –95.14 टक्के
नागपूर – 93.84 टक्के
नाशिक – 93.73 टक्के
लातूर – 93.09 टक्के
औरंगाबाद –92 टक्के
महाराष्ट्रात 9 विभागीय मंडळांमध्ये 10 वीची परीक्षा होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेला 17 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.विशेष म्हणजे राज्यातील 242 मुलांना 100% गुण मिळाले आहेत.


एस.एस.सी बोर्ड परीक्षा  मार्च-2020 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक:- तरुण गर्जना न्युज पेपर टीम





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध