Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ जुलै, २०२०

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाची यशाची उज्ज्वल परंपरा कायम..! संस्थेच्या 20 शाळांचे निकाल 100 टक्के, रोशन पाटील 98.20 टक्के गुण मिळवून शिरपूर तालुक्यात प्रथम..!



शिरपूर:प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ मार्फत जाहीर करण्यात आलेल्या 10 वी च्या निकालात शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाने आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून संस्थेच्या 20 शाळांचे निकाल 100 टक्के लागले  आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. संस्थेच्या 1680 पैकी 1679 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल 99.94 टक्के लागला. विशेष बाब म्हणजे संस्थेतून 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे तब्बल 426 विद्यार्थी व 9 विद्यार्थ्यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. संस्थेतील 1554 विद्यार्थी म्हणजेच संस्थेचे 92.50 टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 113 प्रथम श्रेणीत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याची बाब गुणवत्तेच्या दृष्टीने सर्वांसाठी भूषणावह आहे.

शिरपूर शहरातील आर. सी. पटेल इंग्लिश मेडिअम हायस्कूलचा रोशन कांतीलाल पाटील या विद्यार्थ्याने 98.20 टक्के गुण मिळवून शिरपूर तालुक्यात  प्रथम क्रमांक पटकावला.संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, पिपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी,सर्व संचालक, सीईओ डॉ. उमेश शर्मा,सर्व प्राचार्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
विविध शाखांची टक्केवारी, प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांची नावे, त्यांना मिळालेले टक्के गुण पुढीलप्रमाणे आहेत.
 
आर.सी.पटेल इंग्लिश मेडीयम स्कूल शिरपूर 100 टक्के निकाल.
पाटील रोशन कांतीलाल 98.20 टक्के, सिसोदे निमेश अनिल 96.40 टक्के, भदाणे प्रेरणा दिगंबर 96 टक्के, पवार अनुष्का गजानन 96 टक्के, मराठे विधी भगवान 95.40, देवरे कार्तीक विजय 94.80, धनगर गणेश संजय 94.80. शाळेतील 200 पैकी 62 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य रवी बेलाडकर व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय शिरपूर – 100 टक्के निकाल.
पाटील महेश भरत 97 टक्के, लांडगे इंद्रजीत प्रकाश 96.80, मराठे सुदर्शन बालु 96.80, माळी देवेश अशोक 96.60, जगताप आशिष महेश 96.20, जडिये ओम राकेश 96.20, पाटील अनिकेत प्रविण 96. शाळेतील 370 पैकी 162 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.व्ही. पाटील, सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.आर.पटेल कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर 100 टक्के निकाल.
पाटील भुमिका हंसराज 97.80 टक्के, पाटील वृषाली विश्वास 96.80, बडगुजर हर्षपुजा युवराज 96.40, राजपूत किर्ती विरपालसिंग 96.40, पाटील धनश्री किरण 96.20, वाणी वैष्णवी संतोष 96.20, मोरे समिक्षा संतोष 95.80. शाळेतील 272 पैकी 142 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.  या सर्व विद्यार्थिनींना प्राचार्य आर. बी.पाटील, सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
एस. व्ही. के. एम. संस्था संचालित मुकेशभाई पटेल मिलीटरी स्कूल तांडे ता. शिरपूर 100 टक्के निकाल.

सोनवणे हर्षल रामकृष्ण 94.40 टक्के, पाटील जयदिप यशवंत 93.60, रावते हेरंब रमेश 92, चौधरी राज संजय 91, सै. मोह. कैफ अली मुजफ्फर अली 90.80. शाळेतील 6 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य दिनेशकुमार राणा व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय खर्दे – 100  टक्के निकाल.

पटेल खुशी सतिष 91.45, मराठे रोहित शशीकपूर     91, कोळी केतन रविंद्र 89.40, मोकाटे उन्नती देविदास 89, चौधरी नम्रता रविंद्र 88.40. शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यांना प्राचार्य व्ही.आर.सुतार व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय भोरखेडा - 100 टक्के निकाल.

पाटील वसुधा साहेबराव 93.60, बंजारा निशा मधुकर 92.20, जाधव गायत्री रमेश 91.20, राजपूत मोहिनी योगेंद्रसिंग 90, राजपूत संयोगिता भिकेसिंग 89.60. शाळेतील 4 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.  त्यांना प्राचार्य एन.सी.पवार व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय टेकवाडे - 100 टक्के निकाल.

लोहार किंजल विठ्ठल 91.80, वानखेडे पराग दिलीप 88.20, शिरसाठ विशाल युवराज 86.40, राजपूत शिवानी भरतसिंग 85.60, पाटील ललिता अरुण 85.60, बागुल पुजा मच्छिंद्र 84.80. त्यांना प्राचार्य सिद्धार्थ पवार व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.एच.आर.पटेल कन्या मराठी माध्यमिक विद्यालय वरूळ – 100 टक्के निकाल.

बोरसे वैष्णवी अनिल 88.20, भामरे वर्षा भगवान 87.20, कोळी सपना नाना 86.20, पाटील अश्विनी सुधाकर 85.80, मराठे सरोज वासुदेव 85.60. त्यांना प्राचार्य पी. आर. साळुंखे व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय खंबाळे – 100 टक्के निकाल.

पावरा प्रियंका मगन 92.80, बंजारा रितेश उदयसिंग 91.80, पावरा प्रतिभा चंपालाल  91.00, पावरा विनिता रविंद्र 90.60, बोरसे हर्षदा अशोक 90.20. शाळेतील 7 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यांना प्राचार्य आर.एफ.शिरसाठ व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय अहिल्यापूर – 100 टक्के निकाल.
पावरा बुध्दीराम खुमसिंग 90.40, जाधव उमेश रविंद्रसिंग 90.20, गिरासे ऋतिक रजेसिंग 89.80, मोरे प्रशांत प्रकाश 89, राजपूत नंदिनी पंकजसिंग 88.60. शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यांना मुख्याध्यापक ए.एच.जाधव व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय सावळदे 100 टक्के निकाल.
नाईक अस्मिता राजेंद्र 89.40, राजपूत सुचित्रा महेंद्र 87.60, शिरसाठ तेजस्विनी सुरेश 86.80, शिरसाठ चेतना राजेंद्र 86.80, राजपूत चेतना विश्वास 86.80, राजपूत ऋषि गोटूसिंग 86.80. त्यांना मुख्याध्यापक के. आर. जोशी व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय बभळाज 100 टक्के निकाल.
राजपूत हेमांगी प्रविणसिंग 93.60 (होळनांथे केंद्रात प्रथम), पाटील सुशांत घनशाम 93.20, पवार प्रियंका विजय 93, पाटील दिव्या रितेश 92.60, महाजन पायल गोपाल 91.20. शाळेतील 11 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यांना मुख्याध्यापक आर.एन.पवार व शिक्षक यांचे  मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय गरताड 100 टक्के निकाल.
पावरा सोनी लहज्या 90.80, कोळी आशा हिम्मत 89.60, सनेर रुपेश प्रदिप 89.40, पाटील राकेश शरद 89.40, सनेर पवन ज्ञानेश्वर 89.20, पाटील हितेश विजय 88.40. त्यांना विद्यमान मुख्याध्यापक एस. एन. जोशी व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय पिळोदा 100 टक्के.पावरा ज्ञानेश्वर कैलास 87.40, सोनवणे सपना संजय 86.80, कोळी  निकिता सिताराम 84.60, झिंगाभोई सोनाली सुरेश 84.40, पावरा मगन प्रताप 83.60. त्यांना मुख्याध्यापक पी.एन.गोसावी व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय भामपूर 100 टक्के निकाल.
पाटील मयुर विकास 86.60, पाटील संजना मनोहर 86.60, पाटील शुभांगी  शिवाजी 86.40, पाटील हर्षदा योगेश्वर 85.60. मुख्याध्यापिका सौ. एन.पी.देवरे व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय होळनांथे 100 टक्के निकाल.

पाटील रोशनी लिलाचंद 93.40, पवार प्रियंका रविंद्र 92.20, उबाळे तुषार सुनिल 92, गिरासे सुचिता हिम्मतसिंग 91.40, महाले कल्पेश रविंद्र 91, राठोड रोहिणी चंद्रभान 91. शाळेतील 11 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यांना मुख्याध्यापक व्ही.पी.दिक्षीत व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय झेंडेअंजन 100 टक्के निकाल.
वारुडे आस्था रविंद्र 88, पावरा वंदना पांडुरंग 85.80, गवळी कुणाल देवा 85.60, पावरा शिवा बकाराम 85.60, गवळी चंद्रकला ब्राम्हण 84.60, गवळी रिता सखाराम 83.60. त्यांना मुख्याध्यापक एस. ए. कुरेशी व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल मराठी माध्यमिक आश्रमशाळा शिरपूर – 100 टक्के निकाल.
पावरा लक्ष्मी सायसिंग 92, पावरा रोहित जयसिंग 92, पावरा चेतन भिना 92, पावरा भारती जाणीराम 91.40, पावरा संगिता वाकसिंग 91.20, पावरा नरेश रणजित 90.60,  पावरा रविना सुरेश 90.60, पावरा अनिल लाला 90.40, पावरा विनोद खेमसिंग 90.40, पावरा अविष्कार रणजित 90.40. शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यांना प्राचार्य एच.के.कोळी व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
आर.सी.पटेल मराठी माध्यमिक आश्रमशाळा वाघाडी – 100 टक्के निकाल.

पावरा गणेश लकडू 91.60, पावरा निलेश मुनिराम 89.60, पावरा साजन विजयसिंग 89.40, वळवी जुदा किशोर 88.20, पावरा सुप्रिया प्रेमसिंग 87.80. त्यांना प्राचार्य ए.पी.ठाकरे व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल मराठी आश्रमशाळा निमझरी
100 टक्के निकाल.

पावरा ऋषभ जगन 92.40, भिल  रोहित मधुकर 90.80, पावरा रितेश सुभाराम 90.60, पावरा रितेश युवराज 89.80, पावरा प्रविण ताराचंद 88.40. शाळेतील 3 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यांना प्राचार्य पी.डी.पावरा व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल उर्दू माध्यमिक विद्यालय शिरपूर – 98.70 टक्के निकाल.
शेख अनम रफिक 91, शेख फराजोद्दीन रईसोद्दीन 89.40, सैय्यद मोहम्मद अरकम इफ्तेखार 88.40, शेख फैसल इफ्तेखार 88.20, इनामदार ईकरा नईम अहमद 88.20. त्यांना प्राचार्य मुबिनोद्दीन शेख व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध